बाजार विभाग

संगणक विभाग माहिती तंत्रज्ञान/ सि सि टि व्हि

संगणकीकरणासंबधी कामकाज करणे. आलेले ई-मेल काढणे व ते संबंधीत विभांगास देणे/पाठवणे. बाजार आवारात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सी.सी.टी.व्ही कॅमेरे कार्यरत ठेवणे, कॅमेरे देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडुन दुरुस्ती कामांची कार्यवाही करणे, बाजार घटकांचे तक्रारीचे अनुषंगाने त्यांना सी. सी. टिव्ही फुटेज दाखविणे.

विस्तारित इमारत विभाग व वाहन व्यवस्था विभाग /जन संपर्क विभाग

विश्रामगृह, वाहनविभाग, दुरध्वनी तसेच सर्व प्रकारचे सभा, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे, तसेच राष्ट्रीय सण साजरे करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे व मान्यवरांचे भेटी प्रसंगी चहापान व सत्काराचे नियोजन करणे.

भरारी पथक

बाजारक्षेत्रात तसेच बाजारात व आवाराबाहेर होणा-या भुसार नियमित शेतमालाची अनधिकृत व्यापार करणा-या व्यापा-यांवर कलम 32 अ नुसार दंडात्मक कारवाई करुन बाजार फी व देखरेख खर्च व अनुषंगीक खर्चवसुल करणे तसेच अनुज्ञप्ती धारकाचे दप्तरी नोंदी पडताळून त्याप्रमाणे बाजार फी व देखरेख खर्च वसुल करणे व या अनुषंगाने याविषयीची सर्व कामे करणे.

गुळ भुसार विभाग / वाहनप्रवेश विभाग

विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे बाजार शुल्काचे रकमाची आकरणी, वसुली करणे व त्याविषयीचे नोंदी ठेवणे व संबधित अनुज्ञप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे. मासिकभाडे वसुल करणे.

विधी विभाग

विविध न्यायालयामध्ये बाजार समिती विरुध्द व बाजार समितीने इतराविरूध्द दाखल केलेल्या अपिल याचिका दावे याबाबती कागदपत्रे बाजार समितीच्या वकिलांना देणे, माहिती देणे, न्यायालयात तारखेस हजर राहणे, न्यायालयीन कागदपत्रांची पूर्तता करणे, वकीलांकडून रोजचे रोज सुनावणीच्या तारखा घेणे, कायदेशिर अभिप्राय देणे, भाडेपट्टा तयार करणे, करारनामे करणे.

भांडार व छपाई-लेखन सामुग्री विभाग

विभागाचे मागणीनुसार आवश्यक साहित्य खरेदी व छपाई करणेकामी होणा-या खर्चाचे अंदाजपत्रक घेणे, अंदाजपत्रकानुसार खर्चास मान्यता घेणे, आवश्यकता असल्यास कलम 12(1) नुसार मंजुरीचा प्रस्ताव तयार करणे, खरेदीसाठी दरपत्रके मागविणे, अथवा इ निविदा प्रक्रिया राबविणे, पुरवठा केलेले व त्याचा दर्जा निविदेवरहुकुम असल्याचे साहित्य तपासून घेणे. खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी नोंद रजिस्टरला करणे, विभागाचे मागणीनुसार साहित्य वाटप करणे, स्टॉक रजिस्टर अद्यावत ठेवणे. ग्रंथालयाकरिता आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची मागणी करणे. विभागामध्ये पुस्तके वाचण्यासाठी येणाऱ्या बाजार घटकांना पुस्तके वाचण्यासाठी देणे व परत जमा करुन घेणे व त्याच्या नोंदी ठेवणे.

पेट्रोल पंप विभाग

पेट्रोल, डिझेल अंडरग्राऊड टॅकची डीप घेणे, डेनसिटी घेणे, दैनिक खरेदी विक्रीच्या नोंदी ठेवणे. डी.एस.आर. लिहणे, उधारी वसुली करणे, पेट्रोल, डिझेल खरेदी करीता मागणी करणे, पेट्रोलपंप मशिन देखभाल दुरुस्ती व तपासणी यासंबंधीचे कामे करणे.

फुलांचा बाजार

विभागाचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण व देखरेख करणे, विनापरवाना व्यवसाय प्रतिबंध करणे, बाजार शुल्काचे आकारणी वसुली करणे व त्यासंबंधी अनुषंगिक नोंदीची रजिस्टर ठेवणे, आवक विक्री विषयक नोंदी संकलित करणे व विभागाशी संबधित अनुज्ञप्तीची विषयीचे सर्व कामकाज करणे, जागावापर आकार वसुल करणे. जमा रकमेचा बँक भरणा वेळेत होईल याची दक्षता घेणे.