मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार येथील किरकोळ दुरूस्त्यांची कामे करणे, नविन नळजोड देणे व दुरूस्तीची कामे करणे. चेंबर व ड्रेनेजलाईन दुरूस्ती, नविन चेंबरची कामे करणे, मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार भुखंड / गाळे / दुकाने यांचे अंतर्गत दुरूस्त्यांबाबत परवानगी देणे / नाकारणे. मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार येथील नव्याने करावयाचे बांधकामासंदर्भात त्यांचे नियोजन करून वास्तुशास्त्रज्ञ यांचेकडुन कामाच्या खर्चाबाबतची अंदाजपत्रक प्राप्त करुन कलम 12 (1) नुसार मंजुरी मिळणेबाबत मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण), मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था पुणे आणि मा.पणन संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे मंजुरीस्तव प्रस्ताव सादर करणे. प्रस्तावित कामांस मंजुरी प्राप्त झालेनंतर विहित निविदा प्रक्रिया/ ई-निविदा प्रक्रिया राबविणे. मुख्य बाजार आवार तसेच उपबाजार आवारातील चालु असलेल्या बांधकाम प्रकल्पांवर व कामांवर देखरेख ठेवणे.
बाजार आवारातील व बाजार आवारा बाहेरील वाहतुक नियंत्रित करणे. तसेच पार्कीगचे शुल्क आकारणे.
